Saturday, May 3, 2014

साजण / काही चोरोळ्या

हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन' या विषया वर कित्येक मनोरंजक  पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या)

(१)
लपत छपत तो  बिछान्यात येतो
गोड गोड गाणी कानात म्हणतो
कधी चुंबितो कधी चावतो
सारी रात्र मला तो छळतो 
का सखी साजण?
ना सखी डास.

(२)
कधी काळी येतो
गोड गोड बोलतो
खोटी वचने देऊनी
सर्वस्व लुबाडीतो
का सखी साजण?
ना सखी नेता.
(३)
कधी येते, कधी जाते
सारी रात्र मला ती छळते.
तिच्या विना न चैन मिळे
तिच्या साठी आसुसले डोळे.
का सखा साजणी ?
ना सखा वीज.

(४) 
कधी काळी येतो 
गोड गोड बोलतो.
खोटी वाचणे देतो 
मला फसवितो. 

का सखी साजण
ना सखी नेता. 


No comments:

Post a Comment