Friday, September 8, 2017

एका प्यादा (कठपुतली/कठपुतला )ची जीवन गाथाप्यादाला बोलवा 
प्यादाला न्हावू  घाला 
प्यादाला जेवू घाला
प्यादाला दक्षिणा द्या.


प्यादाचा वापर करा 
प्यादाला डोक्यावर बसवा 
काम झाले कि प्यादाला
पटावर शहीद करा.

मग
नावावर त्याच्या
मेणबत्या लावा
नावाने दुसर्यांच्या 
जोरात बोंबला.

(शेवटच्या क्षणी प्यादाला सत्य कळते, पण उशीर झालेला असतो) 
 
.


Wednesday, September 6, 2017

भू-भू भुंकणारे कुत्रेकुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती सारखा मोठा जनावर दुरून येताना दिसला कि  यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो जनावर जवळ येईल.  कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. कुन्त्र्यांचा स्वभावच दुसरे काय.  पण कधी एखादा हत्ती स्वकर्माने जमिनीवर पडला कि मग काय म्हणता राव झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या एकत्र होऊन जमिनीवर पडलेल्या हत्ती वर तुटून पडतात. काही क्षणात  सर्व कुत्रे मिळून हत्तीच्या शरीराच्या चिंध्या-चिंध्या करतात. कुणाच्या हाती इवलासा मांसाचा तुकडा किंवा फक्त हाड हि लागले तरी जणू काही त्यानेच हत्तीची शिकार केली आहे असा अविर्भाव आणून जोरात वाघा सारखी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करतात. कितीही झाले तरी कुत्रा वाघ बनू शकत नाही. शेवटी तोंडातून भू-भूच निघणार. 

या झुंडीतल्या कुत्र्यांचे अनेक प्रकार असतात. काही कागदांवर भुंकतात. तर काही दृश्य आणि श्रव्य माध्यमातून भुंकतात. आपण हत्तीची कधी आणि कशी शिकार केली याचे रसभरून वर्णन करतात. दुसर्या कुत्र्यांचा झुंडींच्या हाती काही लागू दिले नाही किंवा ते कुत्रे हत्तीचीच मदत करत होते इतपर्यंत यांची मजल जाते. आपणच खरे हे दाखविण्यासाठी सोबत सबूत म्हणून मांसाचा तुकडा किंवा हाड हि दाखवितात.   

एक आणखीन हि प्रकार असतो, हे कुत्रे म्हणजे 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना'.  फ़क्त वरील उल्लेखित कुत्र्यांचे  हत्तीच्या शिकारीचे वर्णन ऐकून, जणू काही आपणच हत्तीची  शिकार केली आहे असा आभास यांना होतो. हे पण शिकारीचे वर्णन आणि हत्तीच्या मांसाचे हाडाच्या स्वादाचे वर्णन एवढ्या खूबीने करतात कि दुसर्यानां वाटेल हेच कुत्रे प्रत्यक्ष घटनेच्या जागी होते आणि शिकार यांनीच केली. फरक एवढाच कि या कुत्र्यांनी कधी हत्तीला पाहिलेही हि नसते. मांसाचा किंवा हाडाचा तुकडा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असो. या आभासी जगात वावरणाऱ्या कुत्र्यांचा वापर कागदावर आणि दृश्य श्रव्य माध्यमात भुंकणार्या कुत्र्यांच्या झुंडी स्वत:च्या स्वार्थासाठी नेहमीच करतात. अफवांचे पिक पसरवण्यासाठी किंवा कुणाचे चारित्र्यहनन या कुत्र्यांच्या मदतीने सहज करता येते. फक्त ठिणगी सोडा आग हे लावतील. पण हे कुत्रे स्कड मिसाईल सारखे असतात, कुठेही जाऊन पडतात.  आपल्या मालकांना हि चावायला कमी करत नाही. असो. 

हा लेख कुत्र्यांच्या स्वभावावर लिहिला आहे, अन्यथा घेऊ नये. तरी हि सर्वांची माफी मागतो.  


Saturday, September 2, 2017

पोष्टिक थालिपीठकाल संध्याकाळी लेकीचा फोन आला. बाबा आज आमच्या हॉस्पिटल मध्ये पोष्टिक पदार्थ बनविण्याची प्रतियोगिता झाली. मी बनविलेल्या थालीपीठला पहिला पुरस्कार मिळाला. मी भाग घेण्याचे ठरविल्या बरोबरच  थालीपीठ बनविण्याचचा निश्चय केला. पुरस्कार नाही मिळाला तरी मराठमोळ्या थालीपिठाबाबत सर्वांना कळेल तरी. आमची सौ. दिवाळीच्या आधी भाजणीचे पीठ तैयार करते, ते जवळ-सात ते आठ महिने चालते.  साहजिकच आमच्या लेकीने तिच्या आईला विचारले.  भाजणीचे पीठ संपले हे कळल्यावर तिची निराशा झाली. पण तीही माझ्या सारखी जिद्दी (आमच्या पटाईत खानदानची विशेषता, एकापेक्षा एक जिद्दी आणि सनकी). थोडा गुण लेकीत हि उतरला आहे. थालीपीठ बनवायचे ठरविले म्हणजे ठरविले. प्रतियोगिताचा एक दिवस आधी संध्याकाळी घरी परतताना तिला एका किरणाच्या दुकानात पतंजालीचा नवरत्न आटा दिसला आणि तिच्या डोक्याची ट्यूब लाईट पेटली.  गहू ,ज्वार, बाजरा, जौ, मक्का, चणा, सिंघाडा, चौलाई आणि सोयाबीन या पासून तैयार झालेला नवरत्न आटा. आता तिने थालीपीठ कसे केले तिच्याच शब्दांत. दोन वाटी नवरत्न आटा घेतला. एका कढईत (लोखंडी) रवा भाजतो तसा हा आटा ३-४ मिनिटे परतला.  अर्धी वाटी बेसन हि घेतले, तेही ३-४ मिनिटे परतले. अश्या रीतीने भाजणी तैयार केली व परातीत टाकली. एक चमचा ओवा, एक चमचा जिरे, १०-१२ काळी मिरीची पूड हि तैयार केली.  त्या नंतर एक पाव पालक आणि २ हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या  धुऊन कढई वर झाकण ठेऊन वाफवून घेतल्या. नंतर मिक्सरमध्ये पालक टाकून प्युरी तैयार केली.   भाजणीत पालकाची प्युरी, तैयार केलेली पूड, व अंदाजे मीठ टाकून पीठ मळून घेतले. पाणी गरजेनुसार टाकले.  गॅस वर तवा ठेवला. थोड्या मंद आंचेवर. तव्यावर अर्धा चमचा तेल लावून थालीपीठ थापून घेतले व २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवले. पुन्हा परतून खरपूस भाजून घेतले. बाकी हास्पिटल मध्ये गेल्यावर सोबत टमाटो, काकडी, गाजर, ढोबळी मिरची पासून केलेली कोशिंबीरिची साईड डिश सोबत ठेवली.  एक आगळीवेगळी मराठमोळी व पोष्टिक डिश परीक्षकाला आवडली आणि तिला पहिले पारितोषिक मिळाले.
Monday, August 21, 2017

धूम्राक्ष : अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम


मानव ऋषीने मोठ्या प्रयत्नाने दगडांना घासून अग्नी प्रज्वलित केली. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना सुरु केली. हे अग्नी, सर्व संसारिक सुख आम्हाला प्रदान कर, गाई- म्हशी, दूध-तूप, धन-धान्य प्रदान कर. आम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंवर विजय मिळवून दे.  "अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम:". 'तथास्तुएक आवाज ऐकू आला. मानव ऋषीने पाहिले, हवन कुंडातून एक धुम्र्वर्णी अशरीरी आकृती, हात जोडून उभी होती. मानव ऋषीने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझे भोजन आणि मानवाच्या इच्छा पूर्ण करणे, हाच माझा धर्म. आज्ञा करा, ऋषिवर. मानव ऋषीने सांशक होऊन विचारले, खरंच! तू सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. धूम्राक्ष म्हणाला, प्रत्यक्षला प्रमाण कशाला. तुमच्या मनात मध खाण्याची इच्छा आहे, याच झाडावरच मधमाश्यांचा पोळआहे. 'नको रे, भयंकर दंश देतात मधु माश्या'.  आता  मधु-माश्यांची भीती नाही. मधाच्या पोळां खाली लाकडे जाळली, धूर निघाला, मानव ऋषी धुर्यामुळे खोकलू  लागले.  मधुमाश्या पोळ सोडून निघून गेल्या, मधुर मधु चाखायला मिळाले. मानव ऋषी आनंदी झाले. धूम्राक्ष हात जोडून मानव ऋषी समोर उभा राहिला पुढच्या आदेशासाठी. 

खांडववन जळत होते, आगीचे डोंब आकाशाला भिडत होते. काळाकुट्ट धूर सर्वत्र पसरला होता. अर्जुनाचा आवाज गुंजला, माणसाला त्रास देणारा एक हि हिंस्त्र पशु जिवंत राहिला नाही पाहिजे. धूम्राक्ष एक-एक करून वनातील सर्व जीव-जंतूंना गिळू लागला. प्राण कासावीस झाल्याने काही वनवासी वनातून बाहेर पडले.अर्जुनाला शरण गेले. बहुतेक जगातील पहिले विस्थापित. खांडववनाच्या राखेवर नवीन भव्यदिव्य विशाल इंद्रप्रस्थ नगर उभे राहिले. नवी मुंबई आणि अमरावती सारखे भव्य महानगर हि उभे राहिले. हिरोशिमा आणि नागासाकी वर अणुबॉम्ब टाकला. आग आणि धुर्यात गुदमरून लक्षावधी लोग मरण पावलें. धूम्राक्षाच्या मदतीने विजय हि मिळाला. माणसाची प्रत्येक इच्छा हा पूर्ण करता-करता, धूम्राक्ष धूर गिळत-गिळत एवढा मोठा झाला आहे, कि आज संपूर्ण पृथ्वी त्याच्या अशरीरी शरीराने झाकल्या गेली आहे.
  
काल संध्याकाळी गच्ची वर उभा होतो, दिसला मला तो धूम्राक्ष. विचारले, अरे तुझ्यामुळे प्राण कासावीस झाला आहें, श्वास हि घेता येत नाही आहे, दिवस रात्र खोकलत राहतो, अस्थमा झाला आहे, मला. तो म्हणाला मालक यात माझा काय कसूर. तुमच्या इच्छा पूर्ण करता करता मी एवढा मोठा झालो आहे. मला रागच आला, त्याचा, तुझ्या  कृत्यांना मी कसा काय दोषी. तो म्हणाला, घरात AC आहे का. मी म्हणालो, संपूर्ण घर ACच आहे. बाहेरची प्रदूषित हवा घरात येऊ नये म्हणून लावला. हो पण त्या AC साठी वीज कुठून येते. कोळसा जळतो, धूर निघतो, मग वीज मिळते, म्हणत धूम्राक्ष जोरात हसला. पुढे म्हणाला,मालक समोर पहा काय दिसत आहे, मी म्हणालो दूर मायापुरीतील कारखान्यांच्या धूर ओकणाऱ्या चिमण्या. तुझे सातमंजली घर मायापुरीतल्या लोखंडी सळ्यानींच बनले आहे. किती गाड्यला आहेत घरी? मी उतरलो, एक माझी, एक माझ्या सौची, एक चिरंजीवाची आणि एक मोठी कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर. तो म्हणालापेट्रोल जळते, धूर निघततो, मगच कार चालते. मी चिडून म्हणालो, माझ्या अस्थम्यासाठी  मीच दोषी आहें, हेच म्हणायचे आहे का तुला? मालिक चिडू नका शांत व्हा. सत्य तेच सांगतो आहे. बाकी मला काय, मी दास आहे, मानवाच्या आदेशाचे पालन करणें माझे कर्तव्य. आपण आदेश द्या. मी पुढे काही न बोलता गुपचूप खाली उतरलो. खोलीत येऊन AC सुरु केला. पण तरीही रात्री मला झोप आली नाही. 

अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम. मंत्राचा अर्थच कळला नाही. सर्व मलाच पाहिजे. त्या साठी कितीही किमंत आपण मोजायला तैयार असतो. कदाचित मानवाच्या अपरमित इच्छांची पूर्ती करता-करता एक दिवस धूम्राक्ष मानवाला हि गिळून टाकेल.
 

Saturday, August 19, 2017

संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का?


शर्माजी ज्यूस स्टाल समोर उभे होते, मला येताना पाहून सहज विचारले, पटाईतजी ज्यूस पिओगे क्या? आपण हि पक्के बेशरम, हाँ हाँ क्यों नहीं. झक मारून शर्माजीने दोन गिलास संत्र्याचे ज्यूस मागविले. ज्यूस पिता पिता शर्मा म्हणाला, हा दुकानदार भेसळ करत नाही, किती गाढे स्वादिष्ट ज्यूस आहे. मी उतरलो, शर्माजी हे संत्र्याचे ज्यूस नाही, किन्नूचे आहे. समोर पहा दुकानात किन्नू सजवून ठेवलेले आहे. पैसे देताना, शर्माने दुकानदाराला सहज विचारले, आप संत्रे कि जगह किन्नू पिलाते हो, कभी- असली संत्रे का ज्यूस भी पिलाया करो. दुकानदार हसून बोलला, ग्राहक दुगनी कीमत देने को तैयार हो तो संतरा भी पिला देंगे. 

भगव्या रंगाचे आंबट गोड ज्यूस म्हणजे संत्र्याचे ज्यूस, हि सामान्य ग्राहकाची कल्पना. त्याला किन्नू, माल्टा आणि संत्र्यातील फरक कळत नाही. भारतात संत्र्याच्या नावावर किन्नूचे ज्यूस देशी विदेशी कंपन्या विकतात. कारण स्पष्ट आहे, किन्नूत संत्र्याच्या तुलनेत जास्त रस. रस हि जास्त गाढ आणि  जास्त गोड. शिवाय स्वस्त: हि. 


पण विदर्भात संत्रा होतो. ८० हजाराहून जास्त हेक्‍टरवर संत्र्याच्या बागा आहेत. दरवर्षी पाच ते सहा लक्ष टन संत्र्याचे उत्पादन होते. कमी पाऊस झाला कि कमी उत्पादन  होते आणि  शेतकर्याचे नुकसान होते. चांगला पाऊस झाला, उत्पादन जास्त झाले तरी संत्र्याला विदर्भा बाहेर पाठविण्याची व्यवस्था चांगली नसल्याने रुपयाचे २ संत्रे विकण्याची पाळी शेतकर्यावर येते.  दुसर्या शब्दांत संत्र्याची शेती हि नुकसानीची शेती. जो पर्यंत संत्र्यावर मोठ्याप्रमाणावर प्रक्रिया करणारे उद्योग लागत नाही संत्र्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे भाग्योदय होणे नाही. 

विदर्भात संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक उद्योग  वेळोवेळी लागले आणि बंद हि पडले. उदा. अमरावती फ्रुट ग्रोअर इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने १९५८ मध्ये   सुरू केलेला प्रकल्प १९६३ मध्ये बंद पडला. नोगा (NOGA) ची स्थापना 1972 मध्ये झाली. या सरकारी कंपनीची वार्षिक क्षमता ४९५० टन अर्थात दिवसाची फक्त १५ टन आहे. हि कंपनी हि संत्र्याचे ज्यूस लोकप्रिय करण्यास असमर्थ ठरली. सध्या टमाटो केचप हे ह्या कंपनीचे मुख्य उत्पादन आहे.  निजी क्षेत्रात हि अनेक संयंत्र सुरु झाले आणि बंद पडले. सरकारी क्षेत्रातला काटोल संयंत्र हि तोट्यामुळे बंद पडला.  मार्केटची सद्य परिस्थितीत पाहता मुफ्त जागा आणि संयंत्रासाठी ५०% टक्के अनुदान दिले तरी कुणी संत्र्याचे ज्यूस काढणारे संयंत्र लावण्याची हिम्मत करणार नाही.  सत्य हेच आहे, संत्रा किन्नू किंवा माल्टा सोबत प्रतियोगिता करू शकत नाही. असे कृषी भवन मधल्या माझ्या एका जुन्या सहकारीचे मत.  

अश्या परिस्थितीत बातमी आली, पतंजली नागपूर मध्ये मेगा फूडपार्क आणि संत्र्याचे ज्यूस काढण्याचे मोठे संयंत्र लावणार आहे.  पतंजलीचा कारभार अत्यंत पारदर्शी असल्यामुळे, काही दिवसांपूर्वी या विषयावर आस्था चेनेल वर चर्चा आणि आचार्य बाळकृष्ण यांचे विचार ऐकले. विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल, नक्षलवाद संपवायचा असेल, तर ग्रामीण भागात मोठ्या संख्येत रोजगार निर्मिती झाली पाहिजे. नागपुरात  मेगा फूडपार्क  लावण्यामागचा हाच उद्देश्य. 

विदर्भात संत्रा होतो, संत्र्याचा ज्यूस काढण्याचा एक मोठा संयंत्र विदर्भातील शेतकर्यांचे भाग्य बदलू शकतो. पण एक खंत हि त्यांच्या भाषणात दिसली, महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत जिथे उद्योगांना कौड़ियों के भाव जमीन दिली जाते, तिथे फक्त विदर्भातील शेकऱ्यांच्या कल्याणासाठी २५ लाख प्रती एकर भाव बाबाजीनी मोजला.  शेती आधारित उद्योगांबाबत सरकारी उदासीनता स्पष्ट दिसून येते.  बाबांची आज्ञा, जगातल्या संत्र्या उद्योगाबाबत माहिती गोळा करणे सुरु केले. माहिती मिळाली, संत्र्याचे ज्यूस काढण्याचा संयंत्र किती हि मोठा असला तरी, फक्त ज्यूस काढून त्याला चालविणे अशक्य.  संत्र्याच्या साली आणि बियांपासून इतर उत्पादने घेतली तर संत्रा संयंत्र चालविल्या जाऊ शकते. इथे तर ग्राहकांना संत्र्याचे ज्यूस इतरांपेक्षा स्वस्त: हि विकायचे आहे.

विदर्भात ५ लक्ष टनपेक्षा जास्त संत्रा होतो. उच्च दर्जेचा संत्रा सोडल्यास बाकी संत्र्याचे अधिकाधिक ज्यूस काढल्यास शेतकर्यांना संत्र्याचा जास्त पैसा मिळू शकतो.   सर्व  बाबींचा विचार करून पतंजलीने  ८०० टन रोज अर्थात वार्षिक २,९०,००० टन क्षमतेचे विशाल संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला. पाच महिने तरी संत्र्याचा ज्यूस काढण्यासाठी हा संयंत्र वापरला गेला तरी दिडेक लाख टन संत्र्यापासून ज्यूस निश्चित काढल्या जाईल. हे वेगळे हा नवीनतम तकनीकवर आधारित संयंत्र इटालियन कंपनी पुरविणार आहे. 

२०१९च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, कि पतंजलीचे हात हि यात जळतील. या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे.