Sunday, December 22, 2013

पौष्टिक पदार्थ (१) बीटच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी.


लहान मुलांच्या आवडी-नावडी फार असतात. बहुतेक पदार्थ आणि भाज्या आई-वडिलांना आवडत नाही पण   पोरांच्या नावाने बोंब मारायला मोकळे होतात आमच्या मुलांना हे आवडत नाही किंवा ते आवडत नाही. . केवळ बटाटा, अरबी आणि भिंडी शिवाय दुसरी भाजी न आवडणारे, पुष्कळ  मुलें बघितली आहे. आमच्या सौ ला न आवडणाऱ्या भाज्या  मुलांच्या पोटात कसं पोहचवायचं ही कला चांगलीच अवगत आहे. तिने खाऊ घातलेले मुलांना आणि मला, पदार्थ आपल्या पर्यंत पोहचवीत आहे. माजी मुले सर्व भाज्या आनंदाने खातात त्याचे श्रेय सौ लाच.    बीट आयरन युक्त अत्यंत पौष्टिक कंद आहे. पुरी आणि बटाट्याची भाजी मुलांना आवडतेच. 


साहित्य : कणिक तीन वाटी, बेसन :१ वाटी (आवश्यक नाही, आवडत असेल तरच) , बीट: १ (१०० ग्राम) जीरा आणि ओव्याची पावडर (प्रत्येकी अर्धा चमचा) व   मीठ  स्वादानुसार व तेल तळण्यासाठी.  

कृती: बीटला सोलून, कापून, थोड पाणी घालून ४-५ मिनटे गॅसवर ठेवा. नंतर मिक्सित घालून पेस्ट बनवून घ्या. कणिक, बेसन एकत्र करून त्यात बीटची पेस्ट, जीरा, ओवा पावडर, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून पुरीचे पीठ मळून घ्या.  कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून, पुऱ्या तळून घ्या. 


बटाट्याची भाजी: बटाट्याची भाजी सर्वच बनवितात पण तरी ही कृती खाली देत आहे. 

साहित्य: उकळलेले बटाटे (१/२ किलो) , हिरव्या मिरच्या २-३, अदरक -लहान तुकडा (मिरची आणि अदरक ची पेस्ट करून घ्या), टोमाटो २-३ (१०० ग्राम) बारीक चिरलेले , हळद, मोहरी, हिंग,जिरे (१/२ चमचे) गरम मसाला (१/२ चमचा), धनिया पावडर (१ चमचा) व तेल (३-४ चमचे –जास्त ही चालेल) व कोथिंबीर (भरपूर) . (कांदे लहसून खाणारे, कांदे लहसून ही घालू शकतात  शकतात). 

कृती: कढई गॅसवर ठेवा त्यात तेल ओता. तेल गरम झाल्या वर मोहरी घाला. मोहरी तडकल्यावर त्यात हिंग, जिरे घाला मग बारीक चिरलेले टोमाटो त्यात घाला. ३-४ मिनटे झाल्या वर तेल सुटू लागेल मग त्यात अदरक मिरची ची पेस्ट घाला, थोड थांबून हळदी, धनिया पावडर, गरम मसाला घाला. नंतर १ गिलास पाणी व स्वादानुसार मीठ घालून एक उकळी येऊ ध्या. मग उकळलेले बटाटे कुस्करून त्यात घाला (चिरलेल्या पेक्षा कुस्करून बटाटे घातल्यास स्वाद जास्ती चांगले येतोझ). पुन्हा १-२ मिनटे उकळी आल्या वर कोथिंबीर घालून गॅस बंद करा. 

बीटची पुरी आणि बटाट्याची भाजी लहान मूले  आनंदाने खातील. 

ह्याच प्रमाणे पालकाची पुरी सुद्धा बनविता येते. पालकाला बारीक चिरून, ३-४ मिनटे गॅस वर ठेऊन. नंतर मिक्सित घालून पेस्ट तैयार करून, बीटच्या पुरी प्रमाणे पालकाची पुरी तैयार करता येईल. 


No comments:

Post a Comment